बाबासाहेबांचं नाव घेणारा माणूस इतकं ‘गचाळ’ कसं बोलू शकतो लोकसभेत?
आठवलेसाहेब, लोकसभेतील तुमच्या कवितांनी समस्त शोषित वर्गाची इज्जत धुळीस मिळत आहे. तुम्हाला कवितेतूनच बोलायचं आहे, तर बोला, पण लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत. त्यांच्या समस्या कशा सुटतील हे बघितलं पाहिजे. सोशल मीडियावर लोक तुमची खिल्ली उडवत आहेत. तुम्हाला ‘पँथर’ म्हणून ओळखलं जातं. ‘दाढीवाला’ म्हणून तुमचा गावागावात दरारा होता\आहे, पण आता ती लढाई राहिली नाही. ‘शस्त्र’ बदलण्याची वेळ आली आहे........